चित्रा वाघ यांनी कुणाचा काढला बाप आणि दम, नेमकं काय म्हणाल्या?
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदच्या कपड्यांवर भाष्य करत पुन्हा उर्फीवर साधला निशाणा
गेल्या काही दिवसांपासून तोकड्या कपड्यांवरून अभिनेत्री ऊर्फी जावेद चांगलीच चर्चेत आहे. अशातच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदच्या कपड्यांवर भाष्य करत पुन्हा उर्फीवर निशाणा साधला.
शुक्रवारी मुंबईत चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत उर्फीच्या तोकड्या कपड्यांच्या वागण्याबद्दल समाचार घेतला. ‘मी कोणाच्या बापाला घाबरत नाही, तुमच्यात जितका दम आहे तितकं तुम्ही करा. उर्फी जावेदच्या कपड्यांना माझा विरोध कालही होता आजही आहे आणि उद्याही राहणार. त्यामुळे हा नंगानाच आम्ही महाराष्ट्रात चालू देणार नाही. ही माझी ठाम भूमिका आहे. तुम्हाला काय करायचं ते करा, असा इशाराच चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदला दिला.
पुढे त्या असेही म्हणाल्या की, ‘तिने याठिकाणी काही पानचट म्हणावं आणि आमच्या मुलांचे फोटो व्हायरल करायचे. आमच्यावर टीका करून पोट भरलं नाही, तर तुम्ही आमच्या कुटुंबावर आलात. आमचा मुलांचा राजकारणासोबत काडीचा देखील संबंध नसताना त्यांचे फोटो व्हायरल करायचं तुम्ही काम केलं काय म्हणावं तुम्हाला..’ असे म्हणत चित्रा वाघ भडकल्यात.