Chitra Wagh Video : 56 वरून वाद पेटला, चित्रा वाघ यांचा रुद्रावतार थेट दिला इशारा; ‘पुन्हा नादाला लागाल तर…’

| Updated on: Mar 22, 2025 | 11:11 AM

भाजपच्या आमदार चित्रा वाघ आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या सुषमा अंधारे आमने-सामने आल्यात. अनिल परबांसारखे 56 पायाला बांधून फिरते असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आणि त्यानंतर सुषमा अंधारे मैदानात उतरल्या. आता पुन्हा बोलल्या तर पुन्हा ठेचून काढेन असा इशारा चित्रा वाघ यांनी दिलाय.

अनिल परबांसारखे 56 पायाला बांधून फिरते, असं विधान परिषदेत भाजपच्या आमदार चित्रा वाघ म्हणाल्या आणि 56च्या आकड्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे मैदानात उतरल्या. चित्रा वाघ यांनी कमी आकडा सांगितला, लोक जास्त आकडा सांगतात असं म्हणत अंधारे यांनी डिवचलं केलं.’एखाद्या विषयासाठी जेव्हा एखादी बाई लढते पायखेच्याला 100 लोक असतात आणि तुमच्यासारखे आहेतच. आणि आज असूदेत की तुम्हालाच उत्तर देते मी, घाबरत नाही तुम्हाला तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते चित्रा वाघ, समजलं काय?’, असं चित्रा वाघ सभागृहात म्हणाल्या. यावर अंधारेंनी पलटवार करत थोडीफार आकडेवारी का होईना परबांनी बाहेर काढली, मी परबांचे आभार मानते. वाघबाईंनी जो आकडा सांगितला तो त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा एकूण आलेख बघितला असता हा आकडा थोडा कमी आहे कारण लोक अत्यंत कौतुकाने आकडेवारी जास्त देतात याचही कृपया त्यांना भान असावं, असं म्हटलं.

चित्रा वाघ आणि अंधारे यांच्यामध्ये जुंपण्याचं कारण म्हणजे रात्रीचे ट्वीट. सभागृहाची सुसंस्कृत परंपरा गरिमा धाब्यावर बसवत एक बाई विचित्र आवाजात किंचाळत म्हणाल्या 56 जण पायाला बांधून फिरते. पण हे दरवेळी सांगायची गरज काय? त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख सांगताना लोक यापेक्षा जास्त आकडा सांगतात. याच ट्वीटला चित्रा वाघ यांनी ही ट्वीटला प्रतिउत्तर देत एकच प्रश्न… जिच्या नवऱ्या सतत पत्रकार परिषद घेऊन लेखकाची डीएनए चाचणी करा म्हणतोय डीएनए चाचणीची मागणी करतोय काय बोलायचं या कार्यकर्तृत्वाच्या आलेखाला कीव वाटते प्रगाढ पोपट पंडिताची स्वतः हिंमत नाही म्हणून असल्या सटराफटरांना पुढे करावं लागतंय, असं चित्रा वाघ म्हणाल्या.

Published on: Mar 22, 2025 11:11 AM
Mumbai Mega Block Update : मुंबईकरांनो…रेल्वेच्या तिन्ही मार्गावर उद्या मेगाब्लॉक, ‘या’ वेळात प्रवास कराल तर होणार गैरसोय
Aurangzeb Tomb : औरंगजेबाच्या कबरीचा वाद सुरूच… NIA चं थेट पथक संभाजीनगरात, कबरीला ‘पुरातत्व’चं संरक्षण अन्…