‘खासदार हेमंत गोडसे गद्दार’, भाजप नेत्याची जिव्हारी लागणारी ‘ती’ पोस्ट व्हायरल
VIDEO | लोकसभेच्या जागेवरून भाजप-शिंदे गटात रस्सीखेच? भाजपच्या नगरसेवकाकडून गोडसे यांचा गद्दार उल्लेख
नाशिक : आगामी लोकसभेला दहा महिने बाकी असताना नाशिकमध्ये लोकसभेच्या जागेवरून भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, भाजप नगरसेवक दिनकर पाटील हे लोकसभेचे इच्छुक उमेदवार असून त्यांच्याकडून करण्यात आलेल्या सोशल मिडीयावरील पोस्टमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. हेमंत गोडसे यांचं नाव न घेता उप्रत्यक्षपणे खासदार असा उल्लेख करत जिव्हारी लागणारी टीका केली आहे. एकीकडे विरोधक गद्दार अशी टीका करत असताना खुद्द भाजपच्या नेगरसेवकानं गद्दार असं म्हटलं आहे. ‘रोज थापा, रोज घोषणा, कान आमचे विटले आहेत, गद्दार हे गद्दारच शेवटी, आता साऱ्यांना पटले आहे. हालअपेष्ठा सहन करत, नागरिक सारे वैतागले आहेत. काम नाही नुसत्या गप्पा, भ्रष्टाचारात दंग आप्पा गाव सारं पाहतं आहे. कारभारी बदलण्यासाठी, रान सारं पेटलं आहे.’ असं व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.