भाजप नगरसेविका प्रीती सातम यांनी BMC अधिकाऱ्यांना भरला दम, बघा VIDEO
मुंबईतील गोरेगांव येथील गोकुळधाम साई मार्गावर गेले काही दिवस सीवरेजचे काम धीम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याने भाजप नगरसेविका प्रीती सातम यांनी या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह कंत्राटदाराला सज्जड दम दिल्याचे पाहायला मिळाले.
मुंबईतील गोरेगांव येथील गोकुळधाम साई मार्गावर गेले काही दिवस सीवरेजचे काम चालू असल्याने या रस्त्यावर खोदकाम आणि गटार नव्याने बांधण्याचे काम चालू आहे. हे काम धीम्या गतीने चालू आहे, तसेच रस्त्याची देखील दुर्देशा झाली आहे. त्यामुळे येथील नागरिकांना वाहने चालविणे सोडाच पण पायी चालताना देखील खूप त्रास आणि अडथळा होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यापार्श्वभूमीवर भाजप नगरसेविका प्रीती सातम यांनी या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह कंत्राटदाराला सज्जड दम दिल्याचे पाहायला मिळाले. तर अधिकाऱ्यांनी ५ जून २०२४ पर्यंत काम पूर्ण करणार असल्याचे आश्वासन दिले. तर दिलेल्या तारखेपर्यंत साई मार्ग व्यवस्थित नाही झाला तर यासंबंधित महापालिका अधिकाऱ्यांविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशारा प्रीती सातम यांनी अधिकाऱ्यांना दिला.