भाजप नगरसेवकावर भररस्त्यात गोळीबार, कुठं घडली घटना अन् काय आहे प्रकरण?
VIDEO | अज्ञात आरोपींनी भररस्त्यात भाजप नगरसेवकाची गाडी अडवून त्यांच्यावर केल्ला हल्ला अन् झाडल्या गोळ्या!
सांगली : सांगलीतील जत नगरपालिकेचे भाजप नगरसेवकाची भररस्त्यात हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भररस्त्यात काही अज्ञातांनी भाजप नगरसेवकाची गाडी रस्त्यात अडवून त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांच्यावर गोळीबार केला. विजय ताड असे हत्या करण्यात आलेल्या नगरसेवकाचे नाव आहे. ताड यांची ईनोव्हा गाडी अडवून अज्ञातांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. जत मधल्या सांगोला रोडवरील अल्फान्सो स्कूलजवळ ही घटना घडली. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. जत पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, घटनेचा तपास करत आहेत. विजय ताड यांच्या गोळीबारानंतर डोक्यात दगड घालून त्यांची हत्या केली. घटना उघड होताच परिसरात एकच गोंधळ उडाला. मात्र हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून आणि कोणी केला आहे हे मात्र समजू शकले नाही. या घटनेची माहिती मिळताच जत पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली आणि तपास सुरू केला आहे.