लूट, स्वारी अन् आता ‘खंडणी’, जयंत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर फडणवीसांचा पलटवार
जयंत पाटील यांच्या एकाच टप्प्यामुळे शिवाजी महाराजांवरून शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि भाजप आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटण्यापूर्वी खंडणीसाठी कळवलं होतं. मात्र खंडणी न मिळाल्याने महाराजांनी सूरत लुटली, असे वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं.
खंडणी न मिळाल्याने महाराजांनी सूरत लुटली, असे वक्तव्य जयंत पाटील यांनी केले तर महाविकास आघाडीच्या नेत्यांना खंडणीच दिसेल, असा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल खंडणी हा शब्द वापरल्याबद्दल शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर भाजपने आक्रमण केलंय. छत्रपती शिवाजी महाराजांना खंडणी न मिळाल्याने त्यांनी सूरत लुटली असे जयंत पाटील म्हणाले. तर महाविकास आघाडी सरकारची ओळख खंडणी होती, त्यामुळे त्यांना खंडणीच दिसेल, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. मात्र जयंत पाटील हे आपल्या खंडणी या शब्दावर ठाम आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने देखील खंडणी या शब्दाचं समर्थन केलंय आणि पुस्तकातील इतिहासाचे दाखले दिलेत. कृ.अ. केळूसरकर यांच्या छत्रपती शिवाजी महाराज आणि राजा शिवछत्रपती बाबासाहेब पुरंदरे या पुस्तकातील दाखला शरद पवारांच्या राष्ट्रवादीने दिलाय.