भाजपचं शिष्टमंडळ पुणे पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात, काय आहे कारण?

| Updated on: Feb 25, 2023 | 5:32 PM

VIDEO | रवींद्र धंगेकर यांनी उपोषण मागे घेतले. मात्र यानंतरही भाजप नेते आक्रमक होत भाजपचं शिष्टमंडळ पोलीस आयुक्तालयात दाखल

पुणे : पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. तर आचारसंहिता देखील मतदारसंघात लागू करण्यात आली आहे. प्रचाराची वेळ संपली असली तरी राजकीय घडामोडी सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. या पोटनिवडणुकीत भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांकडून पोलिसांसमोर पैशांचं वाटप केलं जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केला. दरम्यान, भाजपचं शिष्टमंडळ आज पुणे पोलीस आयुक्तालयात दाखल होत त्यांनी रवींद्र धंगेकर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. रवींद्र धंगेकर यांनी प्रचाराची वेळ संपलेली असताना खोटे आरोप करत आंदोलनाच्या माध्यमातून निवडणुकीचा प्रचार केला. याशिवाय रवींद्र धंगेकर यांनीा आचारसंहितेचा भंग केला, अशी तक्रार भाजपच्या शिष्टमंडळाने पुणे पोलीस आयुक्तांकडे केली.

Published on: Feb 25, 2023 05:27 PM
वरळीतील जांबोरी मैदानात उद्या ठाकरे गटाचा निर्धार मेळावा, बघा कशी सुरूये तयारी
कसबा विधानसभा पोटनिवडणूक रद्द करा, कुणी केली धक्कादायक मागणी?