Special Report | मतदानाआधी कसब्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं

| Updated on: Feb 26, 2023 | 12:33 AM

कसब्यात भाजप विरुद्ध काँग्रेस यांच्यात कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे. त्याआधी पैसे वाटल्याच्या आरोपांवरुन वातावरण नक्कीच तापलं आहे. त्यावरचा टीव्ही ९ मराठीचा स्पेशल रिपोर्ट

पुणे : राज्यात सध्या सर्वांचं लक्ष लागलंय हे कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीकडे. कारण राज्यातील सत्तासंघर्षानंतर लोकांचं कल नेमका कोणाकडे आहे हे या निवडणुकीच्या निकालावरुन स्पष्ट होणार आहे. पण त्याआधी कसब्यातले काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी गंभीर आरोप केलाय. पोलिसांच्याच मदतीनं भाजपचे कार्यकर्ते पैसे वाटत असल्याचा आरोप धंगेकरांनी केला. त्यावरुन कसब्यात राजकीय वातारवण चांगलंच तापलं आहे.

धंगेकर यावरुन थेट उपोषणालाच बसले. धंगेकरांना पोलिसांनी कारवाईचं आश्वासन दिल्यानंतर 3 तासानंतर धंगेकरांनी उपोषण मागे घेतलं. मात्र धंगेकर हे स्टंटबाजी करत असल्याचं भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी म्हटलं आहे.

दुसरीकडे भाजपने धंगेकर यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी केलीये. प्रचार शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजताच संपला, पण त्यानंतर ही ते उपोषणाला बसल्याने हा आचारसंहितेचा भंग असल्याचं भाजपने म्हटलं आहे.

( राज्यातील आणि जगभरातील ताज्या बातम्या मराठीत ( Marathi News ) वाचण्यासाठी Tv9 Marathi च्या वेबसाईटला फॉलो करत राहा. महत्त्वाच्या बातम्या ( Latest Marathi news ) सर्वात आधी तुम्हाला पाहण्यासाठी आमच्या TV9 marathi Live या Youtube चॅनेलला फॉलो करा. )

Published on: Feb 25, 2023 11:14 PM
“चौका पांडे यांना इतक्या वर्षांनी जाग आली का?”, संदीप देशपांडे यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर कुणी लगावला टोला
उस्मानाबादचं नाव धाराशिव आणि औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगरच का? बघा टिव्ही ९ मराठीचा स्पेशल रिपोर्ट