दादा गुलाबी झाले, पण भगवे नाहीत? अजित पवारांसोबतच्या युतीवर देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Sep 06, 2024 | 1:24 PM

गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांमुळे महायुतीत वाद-विवाद सुरू असल्याची चर्चा आहे. तर अजित पवार यांनी महायुतीत घेतल्याने काही नेते नाराज असल्याच्या बातम्याही समोर आल्यात. याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर भाष्य केले.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘टीव्ही 9 मराठी’चा कॉन्क्लेव्ह कार्यक्रमाला आज हजेरी लावली. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांसोबतच्या युतीबद्दल स्पष्टपणे भाष्य केले. अजित पवारांसोबत युती करून चूक झाली का? असा सवाल केला असता, ते म्हणाले, चूक झाली असं म्हणणार नाही. काळाची गरज होती. काळाची गरज असताना संधी आली तर कधी सोडायची नसते. सेटल व्हायला वेळ लागतो. सेटल होईल त्याचा फायदा होईल, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी अजितदादांसोबत युतीवर भाष्य केले. यावेळी त्यांनी एक उदाहरण देत म्हटले, अजितदादा सर्व आमदारांना घेऊन सिद्धीविनायकाला गेले. ४० वर्ष ते राजकारणात आहेत. त्यांना असं कधी पाहिलं का. गेले ना, त्यांना आमचे काही गुण लागणार ना. काळजी करू नका, असं मिश्किल भाष्यही केले. पुढे ते असेही म्हणाले, अजित पवारांना महायुतीतून वगळणार नाही. दादाची एक्झिट नाही. आम्ही सर्व एकत्र राहणार आहोत. छोटे मित्र पक्षही सोबत असतील. लोकसभेलाही महायुती होती तीच विधानसभेत राहील. प्रत्येकाला वाटतं आपला पक्ष मोठा झाला पाहिजे. आपल्याला संधी मिळाली पाहिजे. पण तसं होणार नाही, असेही देवेंद्र फडणवीसांनी म्हटले.

Published on: Sep 06, 2024 01:24 PM