Devendra Fadnavis Tweet : ‘जाऊ द्या, काही नेत्यांना तमाशा…’, बॅग तपासणीवरून भाजपचा उद्धव ठाकरेंना टोला

| Updated on: Nov 13, 2024 | 2:53 PM

यवतमाळच्या वणी विधानसभा क्षेत्रातील ठाकरे गटाचे उमेदवार संजय देरकर यांच्या प्रचारसाठी मविआची सभा झाली. या सभेला जाण्याआधी हेलिपॅडवर उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांच्या बॅग तपासण्यात आल्या. यानंतर उद्धव ठाकरेंसह संजय राऊत यांनी संताप व्यक्त करत मोदी आणि शाह यांची बॅग तपासली का? असा सवाल केला होता.

निवडणूक अधिकाऱ्यांकडून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगेची देखील तपासणी करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगेची तपासणी करताना व्हिडीओ समोर आला आहे. दरम्यान, भाजपा महाराष्ट्रकडून हा व्हिडीओ ट्वीट करण्यात आला असून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधण्यात आला आहे. ‘जाऊ द्या, काही नेत्यांना तमाशा करण्याची सवयच असते! हा व्हिडीओ पहा, 7 नोव्हेंबरला यवतमाळ जिल्ह्यात आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगची तपासणी झाली. पण, त्यांनी ना कोणता व्हिडीओ काढला, ना कोणती आगपाखड केली. तत्पूर्वी, 5 नोव्हेंबर रोजी कोल्हापूर विमानतळावर सुद्धा फडणवीस यांच्या बॅग्जची तपासणी झाली’, असं म्हटलं आहे. तर दिखाव्यासाठी केवळ संविधान हाती घेऊन चालत नाही, तर संवैधानिक व्यवस्थाही पाळाव्या लागतात. संविधानाचे भान प्रत्येकाला असलेच पाहिजे, एवढीच आमची विनंती आहे, असे ट्वीटमध्ये म्हटले आहे. बघा व्हिडीओ

Published on: Nov 13, 2024 02:53 PM
Supriya Sule : ‘आप को जवाब देना पडेगा…’, सुप्रिया सुळे निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीसांवर केस करणार? प्रकरण नेमकं काय?
‘मला पैशांची मदत करा’, विधानसभेच्या तोंडावर भाजप उमेदवाराचं जनतेला आवाहन अन् रोहित पवारांची सडकून टीका