कपिल पाटील यांच्या बॉलिंगवर देवेंद्र फडणवीस यांची तुफान बल्लेबाजी, बघा व्हिडीओ
VIDEO | कपिल पाटील यांच्या बॉलिंगवर देवेंद्र फडणवीस यांची तुफान फटकेबाजी, सोशल मिडियावर होतंय कौतुक
ठाणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आजवर राजकीय व्यासपीठावर विरोधकांवर तुफान फटकेबाजी करताना पाहिले आहे. मात्र भिवंडी येथे आयोजित खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री चषक स्पर्धेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी तुफान फटकेबाजी केल्याचे पाहायला मिळाले. सध्या याचेच कौतुक सोशल मिडियावर होताना दिसतंय. भिवंडीचे भाजप खासदार, केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त खासदार चषकाचे आयोजन केले होते. यामध्ये कपिल पाटील हे गोलंदाजी करत असताना देवेंद्र फडणवीस यांनी थेट चौकार षटकार लावत आपले कौशल्य उपस्थितांना दाखवले. कपिल पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी देवेंद्र फडणवीस भिवंडीत आले होते. तेव्हा हा सामना रंगल्याचे पाहायला मिळाले.
Published on: Mar 06, 2023 08:29 PM