सरकारी बंगल्यात रिल बनवण्याची परवानगी होती? अमृता फडणवीस यांची ‘ती’ क्लिप वादात
अमृता फडणवीस यांची ही क्लिप त्यांच्या गाण्यामुळं किंवा रिल स्टार रियाझ आली यांच्यासोबत असल्यानं नाही तर ही क्लिप त्यांनी सरकारी बंगल्यात शूट केल्यानं सध्या चर्चेत आहे. अशातच राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या हेमा पिंपळे यांनी अमृता फडणवीस यांच्या रिलवर प्रतिक्रिया देत निशाणा साधला आहे.
राज्याचे उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या कायम चर्चेत असतात. नुकतंच त्यांचं ‘आज मुड बना लिया’ हे गाणं प्रदर्शित झालं. अमृता फडणवीस यांच्या पहिल्या पंजाबी गाण्याला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद देखील दिला. प्रेक्षकांनी या गाण्याला दाद दिल्यानंतर अमृता फडणवीस यांनी रिल स्टार रियाझ आली याच्यासोबत ‘आज मूज बना लिया’ गाण्यावर रिल तयार केलं. दरम्यान, अमृता फडणवीस यांची ही क्लिप सध्या चांगलील चर्चेत आहे.
अमृता फडणवीस यांची ही क्लिप त्यांच्या गाण्यामुळं किंवा रिल स्टार रियाझ आली यांच्यासोबत असल्यानं नाही तर ही व्हिडिओ रिल क्लिप त्यांनी सरकारी बंगल्यात शूट केल्यानं सध्या चर्चेत आहे. अशातच राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या हेमा पिंपळे यांनी अमृता फडणवीस यांच्या रिलवर प्रतिक्रिया देत निशाणा साधला आहे.
Published on: Jan 19, 2023 07:40 AM