लोकसभा निवडणुकीत भाजपने पत्रकारांना पैसे वाटले? भाऊ तोरसेकरांच्या ‘त्या’ व्हिडीओने अंतर्गत वाद चव्हाट्यावर

| Updated on: Jun 28, 2024 | 11:29 AM

राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर यांचा एक व्हिडीओ आणि भाजप पदाधिकाऱ्यानं बजावलेल्या नोटीसवरून सुरू झाला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या प्रचारासाठी पत्रकारांसह युट्यूबर्स आणि विविध प्लॅटफॉर्म चालवणाऱ्यांना पैसे दिले गेलेत, असा धक्कादायक आरोप भाजपकडूनच सुरू झाला आहे.

Follow us on

लोकसभा निवडणुकीत भाजपने पैसे वाटले का? ते कोणत्या नॅरेटिव्हसाठी होते? असा सवाल विरोधकांकडून केला जात आहे. या वादाची सुरूवात राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर यांचा एक व्हिडीओ आणि भाजप पदाधिकाऱ्यानं बजावलेल्या नोटीसवरून सुरू झाला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या प्रचारासाठी पत्रकारांसह युट्यूबर्स आणि विविध प्लॅटफॉर्म चालवणाऱ्यांना पैसे दिले गेलेत, असा धक्कादायक आरोप भाजपकडूनच सुरू झाला आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या शिष्टाईने पडदा पडला. मात्र प्रचारासाठी कोट्यवधी रूपये सरकारचे होते का? सोशल मीडियावर कोणते नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी ते पैसे खर्च झालेत. याची उत्तरं द्या, असा सवाल करत विरोधक भाजपवर हल्लाबोल करताय. भाऊ तोरसेकर हे पत्रकार, राजकीय विश्लेषक आणि युट्युबर अशी त्यांची ओळख आहे तर श्वेता शालिनी या महाराष्ट्र भाजप मीडिया सेलच्या प्रमुखपदी आहे. बघा नेमकं प्रकरण काय आहे?