भाजपला लोकशाही मान्य नाही, सत्तेचा दुरुपयोग करत लोकांना टार्गेट केलं- नाना पटोले
पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने रविवारी कारवाई केली. यावर काँग्रेसच्या नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली.
“भाजपच्या चुकीच्या धोरणांविरोधात जो बोलणार, त्यांच्याविरुद्ध कारवाई निश्चित आहे. यासाठी कुठल्याही भविष्यवाणीचीही गरज नाही. भाजपला लोकशाही मान्य नाही. जे लोक धर्माचं राजकारण करून सूडबुद्धीने कारवाई करत आहेत, त्यांचा आम्ही सातत्याने विरोध करू. सत्तेचा दुरुपयोग ते करत आहे, हे आता जनतेलाही कळलं आहे,” अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे. पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने रविवारी कारवाई केली. राऊत यांच्या भांडुप इथल्या निवासस्थानी ईडीने छापे घालून जवळपास नऊ तास शोधमोहीम राबवली. साडेअकरा लाखांची रोकड जप्त करून अधिकाऱ्यांनी राऊत यांना ताब्यात घेऊन ईडीच्या कार्यालयात नेलं.