जागावाटपात भाजपचं वर्चस्व… शिंदेंच्या 5 खासदारांचा पत्ता कट? विरोधकांचा निशाणा काय?
देशात भाजपचे हात बळकट करण्यासाठी शिंदे आणि अजित पवार भाजपसोबत गेले खरे मात्र जागावाटपात भाजपचंच वर्चस्व राहिलं. त्यावरून विरोधकांनी शिंदेंसह दादांना घेरलंय. शिंदेंच्या शिवसेनेच्या जवळपास ५ विद्यमान खासदारांचा पत्ता कट झालाय
महाराष्ट्रातील जागावाटपात भाजपचा वरचष्मा राहिला. शिंदेंनी जाहीर केलेले उमेदवार बदलावे लागल्याने विरोधकांनी एकनाथ शिंदेंसह अजित पवारांना लक्ष्य केलंय. देशात भाजपचे हात बळकट करण्यासाठी शिंदे आणि अजित पवार भाजपसोबत गेले खरे मात्र जागावाटपात भाजपचंच वर्चस्व राहिलं. त्यावरून विरोधकांनी शिंदेंसह दादांना घेरलंय. शिंदेंच्या शिवसेनेच्या जवळपास ५ विद्यमान खासदारांचा पत्ता कट झालाय. अनेक दिवस मुंबईत तळ ठोकूनही हिंगोलीच्या हेमंत पाटलांना तिकीट मिळालं नाही. तर यवतमाळ-वाशिममधून विद्यमान खासदार भावना गवळींना पुन्हा तिकीट मिळालं नाही. यांच्यासह रामटेकच्या कृपाल तुमानेंनाही पुन्हा संधी मिळाली नाही. मुंबईत किर्तीकरांच्या जागेवर भाजपनं दावा सांगितला. तर नाशकातून हेमंत गोडसे यांना उमेदवारीची शक्यता कमी आहे. त्यामुळे सत्तास्थापनेनंतर शिंदेंनी आमदारांना जे सांगितलं होतं. त्याची आठवण करून देत आदित्य ठाकरेंनी शिंदेंनी टोला लगावला. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…