मराठी आणि हिंदुत्व मत एकत्र करुन Mumbai मनपावर BJP चा झेंडा फडकवणार : Ashish Shelar

| Updated on: Jul 10, 2021 | 2:59 PM

पुढील रणनीतीविषयी विचारणा केली असता, मराठी आणि हिंदुत्व मत एकत्र करुन मुंबई मनपावर भाजपचा झेंडा फडकवणार , असे वक्तव्य आशिष शेलार यांनी केले आहे.

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असलं तरी काँग्रेस नेते आणि माजी गृह राज्यमंत्री कृपाशंकर सिंह गेल्या काही काळापासून झाकोळले गेले होते. अशावेळी आता कृपाशंकर सिंह यांनी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ऐन मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कृपाशंकर सिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे महापालिकेतील अनेक समीकरणं बदलण्याची शक्यता आहे. नुकतीच त्यांनी भाजप नेते आशिष शेलार यांची भेट घेतली. या भेटीविषयी आणि पुढील रणनीतीविषयी विचारणा केली असता, मराठी आणि हिंदुत्व मत एकत्र करुन मुंबई मनपावर भाजपचा झेंडा फडकवणार , असे वक्तव्य आशिष शेलार यांनी केले आहे.

Satara | जरंडेश्वर साखर कारखाना कर्ज प्रकरणी पुणे आणि सातारा जिल्हा बॅंकेला ईडीची नोटीस
Mumbai | इंधन दरवाढी विरोधातील मोर्चात बैलगाडी तुटल्यानं भाई जगताप कोसळले