विधानसभेतील बंपर यशानंतर भाजपचं मिशन BMC, मुंबई महापालिका निवडणुकीवर परिणाम होणार?

| Updated on: Nov 28, 2024 | 12:46 PM

आता महाराष्ट्रात स्वबळावर एकहाती सत्ता मिळवली. त्यामुळे आता भाजपने विधानसभेनंतर मिशन बीएमसीकडे आपलं लक्ष केंद्रीत केलं आहे. भाजपला विधानसा निवडणुकीत मिळालेल्या यशाचे, निकालाचे परिणाम मुंबई महापालिका निवडणुकीवर पाहायला मिळणार का?

नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने दमदार यश मिळवून २८८ जागांपैकी २३० जागा जिंकल्या. यंदाच्या निवडणुकीत महायुतीसह भाजपने ऐतिहासिक कामगिरी करत १३२ जागा आपल्या पारड्यात पाडल्या. आता महाराष्ट्रात स्वबळावर एकहाती सत्ता मिळवली. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपने बीएमसीकडे आपलं लक्ष केंद्रीत केलं आहे. भाजपला विधानसा निवडणुकीत मिळालेल्या यशाचे, निकालाचे परिणाम मुंबई महापालिका निवडणुकीवर पाहायला मिळणार का? असा सवाल सध्या चर्चेत आहे. विधानसभा निवडणुकीत मुंबईतील १५ जागा जिंकत भाजपने आपली ताकद दाखवून दिली आहे. भाजप मुंबई पालिकेवर एकहाती सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याची सूत्रांकडून माहिती मिळत आहे. तर भाजपचे मुंबई महापालिकेत १५० जागा जिंकण्याचे लक्ष्य असल्याचेही सूत्रांकडून समजतेय. मुंबईमध्ये १९८० च्या दशकापासून महापालिकेवर शिवसेनेचे वर्चस्व राहिलं आहे. २०१७ च्या पालिका निवडणुकीत शिवसेना ८४ तर भाजपने ८२ जागा जिंकल्या होत्या. दरम्यान, २०१२ च्या तुलनेत २०१७ मध्ये भाजपच्या जागांमध्ये दीडपट वाढ झाली होती. त्यामुळे यंदाच्या महापालिका निवडणुकीत भाजप की शिवसेना कोणाचा विजय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Published on: Nov 28, 2024 12:46 PM
अजमेर शरीफ दर्ग्यात शिव मंदीर? कोणी दाखल केली याचिका? काय केला दावा?
Parth Pawar : ‘हे अत्यंत दुर्देवी, माझा पक्ष अन् वडील…’, अजितदादांच्या मुलानं राष्ट्रवादीच्या आमदारालाच सुनावलं