BJP कडून आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू, काय आहे प्लानिंग?

| Updated on: Sep 26, 2023 | 12:56 PM

VIDEO | लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभा निवडणुकीचं भाजपचं लक्ष्य, भाजपकडून आगामी लोकसभा निवडणुकीबरोबच विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू. प्रत्येक जिल्ह्यात निवडणूक व्यवस्थापन समिती तयार करण्यात आली आहे. या निवडणूक व्यवस्थापन समितीमध्ये विधानसभा संयोजकांची निवड

Follow us on

मुंबई, २६ सप्टेंबर २०२३ | आगामी लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभा निवडणुकीची तयारी भारतीय जनता पार्टीकडून आतापासूनच सुरू करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभा निवडणुकीचं लक्ष्य देखील भाजपनं ठेवले आहे. या तयारीचा एक भाग म्हणून भाजपने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात निवडणूक व्यवस्थापन समिती बनवली आहे. प्रत्येक जिल्ह्यात निवडणूक व्यवस्थापन समिती तयार करण्यात आली आहे. या निवडणूक व्यवस्थापन समितीमध्ये विधानसभा संयोजकांची निवड देखील करण्यात आली आहे. जो संयोजक असेल त्याच्यावर लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभा निवडणुकीची मोठी जबाबदारी असणार आहे. निवडणूक व्यवस्थापन समितीमध्ये निवड करण्यात आलेले विधानसभा संयोजक हे मतदारसंघात नियोजन करणार आहेत. तर निवडणूक व्यवस्थापन समितीमधील विधानसभा संयोजकांना प्रदेशस्तरावरील प्रदेश कमिटीला यासंदर्भात माहिती द्यावी लागणार आहे.