गेल्या चुकांची पुनरावृत्ती यंदा लोकसभा निवडणुकीत होणार? काय म्हणाले गुलाबरावांच्या वक्तव्यावर गिरीश महाजन?

| Updated on: Mar 31, 2024 | 1:52 PM

मागच्या चुकांची पुनरावृत्ती पुढील काळात भाजपकडून होऊ नये, असं वक्तव्य शिंदे गटाच्या शिवसेनेचे नेते आमदार गुलाबराव पाटील यांनी करत भाजपवर निशाणा साधला होता. तर गुलाबराव पाटील यांना भाजपचे नेते मंत्री गिरीश महाजन यांनी उत्तर दिलंय. काय म्हणाले गिरीश महाजन बघा...

Follow us on

गेल्या वेळी आम्ही लोकसभेची कामं केली पण विधानसभेत आमच्यासमोर भाजपने बंडखोर उमेदवार उभे केले. तर  जागा वाटपाचा निर्णय हा पार्लिमेन्ट्री बोर्डाचा आहे. ज्यामध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि अजित पवार यांचा समावेश आहे. जागावाटपाचा निर्णय आणि त्यावर शिक्कामोर्तब हे केंद्रात होतं. ९० जागांचं वाटप योग्यरितीने झालंय. पण १-२ जागांवर अडलंय. मागच्या काळात भाजपने कुठेही बंडखोर उभे केले नाही, असं गिरीश महाजन म्हणाले. तर कुठे बंडखोर उभे राहत असतील तर आपण आवरू शकत नाही. यावेळी कुठेही बंडखोरी होणार नाही, याची काळजी घेतली जाईल असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय.