Pramod Sawant पुन्हा एकदा गोव्याच्या मुख्यमंत्रिपदी
गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा प्रमोद सावंत यांची नियुक्ती करण्यात आलीय. भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत हा प्रमोद सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.
गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपनं दमदार विजय मिळवल्यानंतर गोव्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण असा सवाल विचारला जात होता. त्यातच विश्वजीत राणे यांनी काही काळ यात रंगत निर्माण केली होती. मात्र, आता गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा प्रमोद सावंत यांची नियुक्ती करण्यात आलीय. भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत हा प्रमोद सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. मुख्यमंत्री निवडीसाठी पर्यवेक्षक म्हणून आलेले भाजप नेते नरेंद्र सिंह तोमर यांनी प्रमोद सावंत यांच्या नावाची घोषणा केली. त्यावेळी भाजपचे गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते उपस्थित होते.