रोहित पवार बिनडोक माणूस, भाजप आमदारानं केला रोहित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल
VIDEO | 'या' भाजप आमदारानं रोहित पवार बिनडोक असल्याचे म्हणत केली जोरदार टीका, बघा व्हिडीओ
पुणे : राज्यात गेली तीस ते चाळीस वर्षे पवार अँड पवार ही नाटक कम्पनी आहे आणि त्याचे दिग्दर्शक शरद पवार आहेत, अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. यावेळी गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधत, रोहित पवार हा बिनडोक माणूस आहे, त्याला प्रत्येक प्रश्नावर काही तरी बोलायचे असते, त्याला राजकारणात सर्वच ठिकाणी बोटे घालण्याची सवय आहे अशा शेलक्या शब्दात त्यांनी रोहित पवार यांच्यावर टीका केली आहे. तर शरद पवार समजेपर्यंत ठाकरेगटात केवळ बाप लेक म्हणजे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच उरतील, असं गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत. ट्विट करत त्यांनी हे टीकास्त्र डागलंय. ही टीका करताना त्यांनी शरद पवारांना शकुनी काकाची उपमाही दिली आहे.
Published on: Feb 23, 2023 03:30 PM