अजित पवार यांच्यानंतर मनसेही भाजपसोबत येणार? राज ठाकरे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले….
VIDEO | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना युतीची ऑफर?, राज ठाकरे ऑफर स्वीकारणार की नाही? वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये झालेल्या मनसे पदाधिकाऱ्यांच्या संघटनात्मक बैठकीत राज ठाकरे यांनी काय म्हटलं?
मुंबई, १४ ऑगस्ट २०२३ | राज ठाकरे यांनी वांद्रे येथील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भाजपची ऑफर असल्याचं सांगितलं. राज ठाकरे म्हणाले, मला भाजपची ऑफर आहे. पण, मी अद्याप कोणत्याही निर्णयाप्रत आलेलो नाही. एकनाथ शिंदे भाजपसोबत आहेत. आता अजित पवार हेही भाजपसोबत आले. अजित पवार यांचं भाजप नेमकं काय करणार आहे. हे त्यांनी अजून मला काही सांगितलं नाही. त्यामुळे भाजपच्या ऑफरबद्दल कोणताही निर्णय घेतलेला नाही, असं राज ठाकरे यांनी म्हंटलं. भाजपची ऑफर असल्याचं राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांसमोर शेअर केलं. लोकसभेच्या निवडणुकीसाठी कामाला लागा, अशा सूचना राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. मनसेची मुंबई, पुणे आणि नाशिकच्या पलीकडे फारशी ताकद नाही. मनसेचा सध्या एकच आमदार आहे. १७ वर्षांत खासदारकीचं खातं उघडलं नाही. मनसेला भाजपची साथ मिळाल्यास मनसेला बुस्ट मिळू शकतो. मनसे भाजपसोबत आल्यास मिशन मुंबईचा भाजपचा मार्ग सोपा होईल. मनसेमुळे भाजप-शिंदे गट आणि अजित पवार गट ही महायुती आणखी भक्कम होईल. राज ठाकरेंबरोबर आल्यास उद्धव ठाकरेंविरोधातल्या लढाईला मदत होईल.