सुप्रिया सुळे यांचा मोठा गौप्यस्फोट; ‘भाजपने राष्ट्रवादी फोडण्यासाठी…’, एका मुलाखतीत नेमकं काय म्हणाल्या?
VIDEO | राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा मोठा गौप्यस्फोट; इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या, 'भाजपने आतापर्यंत राष्ट्रवादी फोडण्यासाठी ३ वेळा प्रयत्न केले'
मुंबई, २४ ऑगस्ट २०२३ | ‘भाजपने आतापर्यंत राष्ट्रवादी फोडण्यासाठी ३ वेळा प्रयत्न केलेत. यावेळी भाजपला यश लाभलं ते राष्ट्रवादी फोडण्यात यशस्वी झाले. राष्ट्रवादी फोडण्यासाठी भाजप त्यांची रणनिती सतत बदलत राहिलं. पण तिसऱ्या वेळी राष्ट्रवादी फोडण्यासाठी भाजपची खूप सखोल योजना होती. ‘, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सुप्रिया सुळे यांनी हे मोठं विधान केलं आहे. शरद पवार यांचे सर्वांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे भाजपकडून अनेकदा ऑफर आल्याचेही सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितलं. पण शरद पवार यांनी कधीही भाजपशी हातमिळवणी केली नाही.
Published on: Aug 24, 2023 08:43 PM