व्होट बँकेच्या भीतीने रामलल्लाला ७० वर्ष तंबूत ठेवलं, काँग्रेसवर अमित शाह यांचा हल्लाबोल
'काँग्रेसने व्होट बँकच्या लालसेत देशाच्या संस्कृतीला मागे टाकण्याचं काम केलं. या देशात राम मंदिर आधीच व्हायला हवं होतं. पण काँग्रेसने व्होट बँकेच्या भीतीने रामलल्लाला ७० वर्ष तंबूत ठेवलं. मोदींनी अयोध्येत रामलल्लांचं भव्य मंदिर बांधून प्राणप्रतिष्ठापना केली. मोदींनी काशीविश्वानाथ कॅरिडोअर केलं'
जळगाव, ५ मार्च २०२४ : शरद पवार यांना सांगतो… तुम्हाला ५० वर्षापासून लोक सहन करत आहे. ५० वर्षाचं सोडा. पाच वर्षाचा तरी हिशोब जनतेला द्या, असे आव्हानच अमित शाह यांनी शरद पवार यांना दिलं. पुढे ते असेही म्हणाले, मोदींना तिसऱ्यांदा ४०० पार देऊन विजयी करा. आम्ही त्यासाठी पूर्ण काम केलं आहे. काँग्रेसने व्होट बँकच्या लालसेत देशाच्या संस्कृतीला मागे टाकण्याचं काम केलं. या देशात राम मंदिर आधीच व्हायला हवं होतं. पण काँग्रेसने व्होट बँकेच्या भीतीने रामलल्लाला ७० वर्ष तंबूत ठेवलं. मोदींनी अयोध्येत रामलल्लांचं भव्य मंदिर बांधून प्राणप्रतिष्ठापना केली. मोदींनी काशीविश्वानाथ कॅरिडोअर केलं. ४० वर्षांपासून अडकून पडलेलं वन रँक वन पेन्शन मोदींनी जनतेला दिलं आहे. मोदींनी ३३ टक्के आरक्षण दिलं. मातृशक्तीला बळ दिलं. ट्रिपल तलाक संपवलं. गरीबांना धान्य मोफत दिलं. देशात टॉयलेटची निर्मिती केली. १२ कोटी लोकांना गॅस सिलिंडर दिलं. ४ कोटी लोकांना घरे दिलं. ११ कोटीहून अधिक शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये देण्याचं काम मोदींनी केलं आहे. मोदींनी लसीकरण मोहीम यशस्वी राबवली. पाच पैसेही लसीचे घेतले नाही, असे म्हणत मोदींनी जनतेसाठी आतापर्यंत काय-काय केलं याची अमित शाह यांनी यादीच वाचून दाखवली.