Kangana Ranaut : नुकतीच झाली खासदार अन् हे काय घडलं… कंगणा रणावतच्या कुणी लगावली कानाखाली?

| Updated on: Jun 06, 2024 | 5:58 PM

कंगना राणावत आज दिल्लीसाठी रवाना होत असताना तिच्यासोबत एक धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. कंगना राणावत दिल्लीला जाण्यासाठी चंदीगड विमानतळावर दाखल झाली असता तिच्या कानाखाली लगावल्याचा आरोप कंगना राणावतच्या राजकीय सल्लागाराने केला आहे.

हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून अभिनेत्री कंगना राणावत दणदणीत विजय झाला. यानंतर कंगना राणावत आज दिल्लीसाठी रवाना होत असताना तिच्यासोबत एक धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. कंगना राणावत दिल्लीला जाण्यासाठी चंदीगड विमानतळावर दाखल झाली असता तिच्या कानाखाली लगावल्याचा आरोप कंगना राणावतच्या राजकीय सल्लागाराने केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंगना राणावत हिने शेतकरी आंदोलनाविरोधात वक्तव्य केल्याने सीआयएसएफ गार्डने कानाखाली लगावल्याची घटना घडली आहे. महिला कॉन्स्टेबल कुलविंदर कौर हिने कंगना राणावतच्या कानाखाली लगावल्याची घटना घडली आहे. कंगना राणावतने कानाखाली लगावणाऱ्या महिला कॉन्स्टेबलच्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. कंगना राणावतला चंदीगडहून दिल्लीला जायचे होते. सीआयएसएची महिला जवान कुलविंदर कौर हिने सुरक्षा तपासणीदरम्यान दुपारी साडेतीनच्या सुमारास हे कृत्य केले. बघा व्हिडीओ

Published on: Jun 06, 2024 05:58 PM
Jayant Patil : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला साताऱ्यात का बसला फटका? जयंत पाटलांनी सांगितलं पराभवाचं मोठं कारण
Modi 3.0 Govt : NDA चं सरकार पण मोदींची डोकेदुखी वाढणार? नीतिश कुमार-चंद्रबाबूंची मागणी फार