अखेर महालक्ष्मीचं दर्शन घेतलं! हसन मुश्रीफ यांच्यावरील कारवाईनंतर किरीट सोमय्या कोल्हापुरात

| Updated on: Jan 16, 2023 | 12:12 PM

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कोल्हापुरच्या महालक्ष्मी देवीचं दर्शन घेतलं. यावेळी हसन मुश्रीफ यांच्या कारवाईसाठी अंबाबाईने बळ द्यावं, असं साकडंही त्यांनी अंबाबाईला घातलं आहे.

हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानावर ईडीने घातलेल्या छापेमारीच्या कारवाईनंतर पाच दिवसांनी भाजप नेते किरीट सोमय्या आज, कोल्हापुरात दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी कोल्हापुरच्या महालक्ष्मी देवीचं दर्शन घेतलं. यावेळी हसन मुश्रीफ यांच्या कारवाईसाठी अंबाबाईने बळ द्यावं, असं साकडं देखील सोमय्या यांनी घातलं आहे.

मुश्रीफांवरील कारवाईनंतर पहिल्यांदा किरीट सोमय्या कोल्हापुरात दाखल झाले आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, उपरवाले के सामने कुछ नही चलता… अंबाबाईच्या दर्शनासाठी ज्या मुश्रीफांनी मला अडवलं होतं, त्यांनी नंतर कोल्हापुरात यावं असं सांगितलं. जी-२० चे नेतृत्व देशाकडे आहे. त्या गतीने विकास करायचा आहे. महाराष्ट्राला भ्रष्टाचारमुक्त, माफियामुक्त करायचे आहे आणि तसाच विडा मी उचलला असून अंबाबाईकडे आशीर्वाद मागितल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Published on: Jan 16, 2023 12:12 PM
‘माझा कोणत्याच पक्षाशी संबंध नाही, फक्त…’, राजू शेट्टी यांचं मोठं विधान
तर मुंबईच्या मिठी नदीत प्रेते तरंगताना दिसली असती; संजय राऊत यांनी भाजपला सुनावले