किरीट सोमय्या यांचा घोटाळ्याचा आरोप, सर्वात मोठी महापालिका गुन्हेगारांना घालतेय पाठिशी

| Updated on: Jan 21, 2023 | 1:15 PM

सर्वात मोठ्या महापालिकेतील धक्कादायक घोटाळा, किरीट सोमय्या यांनी कोणता केला गंभीर आरोप?

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून घोटाळ्यांची पोलखोल करण्यात आली आहे. कोरोना महामारीच्या काळात मुंबई महापालिकेत झालेल्या 100 कोटींच्या घोटाळ्याचा चौकशी अहवाल आला. महापालिकेचे सहआयुक्त सुनील धामणे यांनी हा अहवाल सादर केला आहे. या अहवालात भ्रष्टाचार झाल्याचे कबूल करण्यात आले असले तरी कोणतीही कारवाई करू नये, अशी शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे याप्रकरणी सुनील धामणे यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.

तसेच एकाच स्टँप पेपरवर महापालिकेने दोन करार केल्याची धक्कादायक माहिती या अहवालात देण्यात आली असून या प्रकऱणी महापालिकेवर गुन्हा दाखल कऱण्यात यावा, अशी मागणीही सोमय्या यांनी केली आहे. सोमय्या यांनी एक पत्रकार परिषद घेऊन सर्वात मोठी महापालिका बीएमसी मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावर भाष्य केले आहे.

Published on: Jan 21, 2023 01:02 PM
मोठी बातमी : ‘या’ जिल्ह्यातील सहलीला गेलेल्या ५२ विद्यार्थ्यांना विषबाधा
…म्हणून निकाल द्यायला निवडणूक आयोगाला लागतोय वेळ, संजय राऊत यांचा आरोप