सुषमा अंधारे यांच्या ‘त्या’ प्रश्नावर किरीट सोमय्या यांचे थेट उत्तर, बघा काय म्हणाले?
VIDEO | किरीट सोमय्या ईडीचे अधिकारी आहेत की अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आहे? सुषमा अंधारे यांच्या टीकेला किरीट सोमय्या यांनी काय दिलं प्रत्युत्तर
मुंबई : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ईडी आणि अतिक्रमण विभागाच्या कार्यक्षेत्रात सातत्याने हस्तक्षेप करणारे किरीट सोमय्या आहेत तरी कोण? किरीट सोमय्या ईडीचे अधिकारी आहेत की अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आहे? असा थेट सवाल सुषमा अंधारे यांनी किरीट सोमय्या यांना केला होता. यावर किरीट सोमय्या यांनी सुषमा अंधारे यांना थेट प्रत्युत्तर दिली आहे. मीच तक्रारदार असल्याने मला तक्रारीची माहिती घ्यावीच लागते. ‘तुम्ही सगळे बोलतात की किरीट सोमय्याला आधी कसं कळतं परंतु यामध्ये तुम्ही पाहत नाही की किरीट सोमय्या हाच मुळात तक्रारदार आहे. त्यामुळे मला सर्व गोष्टी माहित असणार आणि मी दिलेल्या तक्रारीनुसार मला त्याची माहिती घ्यावी लागणार. या लोकांनी या आधीच अशा प्रकारचे घोटाळे केलेले आहेत तर ते आता घाबरत आहेत’, असेही किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.