भाजपनं टूर अँड ट्रॅव्हल्स नावाचं नवं खातं उघलंय, राज ठाकरे यांनी काय लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरे यांनी भाजपसह निवडणूक आयोगावर टीका केली असताना आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं देखील उद्धव ठाकरे यांच्या मताशी एकमत झाल्याचे पाहायला मिळत आहे. 'तुम्ही काय कामे केली त्यावर निवडणुका लढवा', अमित शाह यांच्या 'त्या' वक्तव्यावरून राज ठाकरे यांनी भाजपला फटकारलं
ठाणे, १६ नोव्हेंबर २०२३ | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मध्यप्रदेशात प्रचार सभेत बोलत असताना मध्य प्रदेशातील निवडणुकीत जनतेला अयोध्येतील प्रभू श्रीरामाचं मोफत दर्शन देण्याचे आश्वासन दिले. तर भाजप मध्यप्रदेश सरकारकडून रामलल्लाचे मोफत दर्शन घडवणार असल्याचा शब्द दिला. यावरून उद्धव ठाकरे यांनी भाजपसह निवडणूक आयोगावर टीका केली असताना आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं देखील उद्धव ठाकरे यांच्या मताशी एकमत झाल्याचे पाहायला मिळत आहे. अमित शाह यांनी मध्य प्रदेशातील भाषणात राम मंदिराचे दर्शन मोफत होणार असल्याचे जनतेला आश्वासन दिले, त्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर राज ठाकरे यांनी खोचक भाष्य केले आहे. ते म्हणाले, अमित शाह यांनी टुर एण्ड ट्रॅव्हलस खाते उघडलेलं दिसत आहे. तुम्ही काय कामे केली आहेत, त्यावर निवडणुका लढवा. राम मंदिरावर काय निवडणुका लढवतात. प्राचारात काय कामे केली आहेत ते सांगा, असे म्हणत त्यांनी भाजपला फटकारलं आहे.