महायुतीत 18 जागांचा तिढा असताना अमित शाहांना वेगळंच टेन्शन, भाजप नेत्यांना केल्या थेट सूचना
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीत बैठक बोलावली होती. आज महायुतीची अमित शाहांसोबत दिल्लीत बैठक सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत दिल्लीत ही महायुतीची बैठक पार पडली. यामध्ये शहांनी राज्यातील नेत्यांना काही सूचना केल्यात
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज दिल्लीत एक बैठक बोलावली होती. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते. या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी भाजप नेत्यांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्याचे समोर आले आहे. ज्यांना विधानसभेचं तिकीट मिळालं नाही असे इच्छूक बंडखोरी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे बंडखोरी टाळण्यासाठी अमित शाह यांनी भाजप नेत्यांना सूचना केल्याची माहिती मिळतेय. नाराज झालेल्यांची सगळ्या प्रकारची समजूत काढा, असे अमित शाह यांच्याकडून सांगण्यात आले आहे. तर मतांची विभागणी आणि पक्षातील बंडखोरी रोखा, बंडखोर नेत्यांवर भाजपच्या नेत्यांनी नियंत्रण ठेवावे, अशा सूचना अमित शाह यांनी आज झालेल्या बैठकीतून राज्यातील नेत्यांना दिल्या आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. बघा व्हिडीओ…