Devendra Fadnavis : ‘…त्यांच्या पाय चाटण्याला भाजपचा आक्षेप’, देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंवर भडकले अन् दिलं थेट प्रत्युत्तर

| Updated on: Nov 18, 2024 | 12:46 PM

देवेंद्र फडणवीस यांनी काल झालेल्या त्यांच्या सभेत महाविकास आघाडी मतांचं ‘वोट जिहाद’ करतंय. आपल्याला रामराज्य आणायचं असल्यास ‘धर्मयुद्ध’ करावंच लागेल, असं वक्तव्य केलं होतं. दरम्यान, यावर आक्षेप घेत धर्मयुद्ध म्हणून फडणवीस दंगलींना प्रोत्साहन देत आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने धर्मयुद्ध शब्दावर आक्षेप घ्यावा, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. यावर काय म्हणाले फडणवीस?

विधानसभा निवडणूक दोन दिवसांवर आली आहे. अशातच राजकीय पक्ष आणि नेत्यांचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आलाय. अशातच आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी tv9 मराठीला खास मुलाखत दिली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे, महाविकास आघाडी आणि असदुद्दीन ओवैसी यांच्यावर निशाणा साधत थेट प्रत्युत्तर दिलं. देवेंद्र फडणवीस यांनी काल झालेल्या त्यांच्या सभेत महाविकास आघाडी मतांचं ‘वोट जिहाद’ करतंय. आपल्याला रामराज्य आणायचं असल्यास ‘धर्मयुद्ध’ करावंच लागेल, असं वक्तव्य केलं होतं. दरम्यान, यावर आक्षेप घेत धर्मयुद्ध म्हणून फडणवीस दंगलींना प्रोत्साहन देत आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने धर्मयुद्ध शब्दावर आक्षेप घ्यावा, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. यावर देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केले आहे. सज्जाद नोमानी यांच्या विधानावरून फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आणि म्हणाले, सज्जाद नोमानी यांनी दंगलींमधील मुस्लीम लोकांवरचे खटले मागे घ्यायला सांगितलं. त्यांनी सांगितलं जे भाजपला मदत करतात त्यांना सोशल बायकॉट करा. या दंगली नाहीयेत? यावर उद्धव ठाकरे का बोलत नाहीत? कारण आता ते हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र राहिलेले नाहीत. ते जनाब बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र झालेले आहेत, असं म्हणत देवेंद्र फडणवी यांनी निशाणा साधला आहे. सज्जाद नोमानीचं पाय चाटणं जे सुरु आहे. त्याला आमचा विरोध आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

Published on: Nov 18, 2024 12:46 PM
कल्याणमध्ये प्रचाररॅलीत कार्यकर्त्यांचा उत्साह; उडवले फटाके अन् ठिणगीनं उमेदवाराचे केसचं जळले
Devendra Fadnavis : शरद पवारांमुळे 2019 ला राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीसांचा गौप्यस्फोट; म्हणाले, ‘100 टक्के खरंय… ‘