भाजपनं बेवकूफ बनवलं यार… घरवापसी होताच माजी आमदाराचा ‘मातोश्री’तून हल्लाबोल

| Updated on: Jul 26, 2024 | 3:03 PM

आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच गोंदिया जिल्ह्यात भाजपला हा मोठा धक्का मानला जातोय. भाजपचे माजी आमदार रमेश कुथेंची ठाकरे गटात घरवापसी झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थिती मातोश्री या निवासस्थानी रमेश कुथेंनी पक्षप्रवेश केला आहे. माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाले...

भाजपचे माजी आमदार रमेश कुथेंची ठाकरे गटात घरवापसी झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थिती मातोश्री या निवासस्थानी रमेश कुथेंनी पक्षप्रवेश केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच गोंदिया जिल्ह्यात भाजपला हा मोठा धक्का मानला जातोय. तर रमेश कुथे हे 1995 आणि 1999 असे दोन वेळा शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक जिंकले होते. त्यानंतर 2004 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना काँग्रेसच्या गोपालदास अग्रवाल यांनी पराभूत केलं होतं. त्यानंतर 2004 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना काँग्रेसच्या गोपालदास अग्रवाल यांनी पराभूत केलं होतं. 2019 मध्ये रमेश कुथे यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. दरम्यान, शिवबंधन बांधल्यानंतर कुथे म्हणाले, चंद्रशेखर बावनकुळे फेब्रुवारी 2024 मध्ये नागपूरला आले होते. आपल्याकडे येणाऱ्यांची खूप मोठी लाईन आहे, असं त्यावेळी त्यांनी मला सांगितलं होतं. 100 जण आपल्याकडे येतील आणि 5 जण जातील. त्याने आपल्याला फरक पडत नाही. त्याच दिवशी कळलं की भाजपने आपल्याला बेवकूफ बनवलं आहे. त्यामुळे आज आम्ही मातोश्रीत आलो असल्याचे माजी आमदार रमेश कुथे म्हणाले.

Published on: Jul 26, 2024 03:03 PM
‘ते परदेशात होते, राज्यात काय सुरूये हे समजून…’, राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची खोचक टीका
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा; पंढरपुरात प्रक्षाळपूजा संपन्न