‘मंत्रीपदाचा सट्टा लावून आम्ही शिंदेंबरोबर…’, गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटील म्हणताय…

| Updated on: Mar 12, 2023 | 6:54 PM

VIDEO | भाजप आणि मनसेच्या युतीवर काय म्हणाले भाजपाचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील बघा व्हिडीओ

पुणे : ‘आम्ही मंत्रीपदाचा सट्टा लावून एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला’, शिंदे यांच्या शिवसेनेतील नेते गुलाबराव पाटील यांनी असे वक्तव्य केले यानंतर त्यांच्या या वक्तव्याचा वेगवेगळा अर्थ काढून जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, याबाबत भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले आहे. ‘गुलाबराव पाटील यांच्यासारखी माणसं ग्रामीण भागात वाढली आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात ज्या भाषेत बोलतात त्या भाषेत ते बोलले. शहरी भागात जरा पॉलिश करून बोलतात. जसं आम्ही रिस्क घेतली. त्या रिस्कला गुलाबराव पाटील आम्ही सट्टा खेळलो असे म्हटले’, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली. यासह चंद्रकांत पाटील यांनी भाजप आणि मनसे या पक्षांच्या युतीबाबत देखील भाष्य केले बघा काय म्हणाले….

Published on: Mar 12, 2023 06:54 PM
कुणी झाशीची राणी तर कुणी सावित्रीबाई; एकल महिलांचा ‘फॅशन का जलवा’
सोलापुरात रंगपंचमीचा अनोखा रंगगाडा उत्सव, बघा एक झलक