संजय राऊत बांग देणारा कोंबडा, भाजप नेत्याची खोचक टीका
'संजय राऊत म्हणाले होते याची लायकी काय?, अरे मी सात वेळा एकाच मतदार संघातून निवडून आलो आहे. तूम्ही राज्यातील कोणत्याही मतदार संघातून उभे राहून निवडून येऊन दाखवा... घरात बसून सकाळी उठलं की कोंबड्या सारखी बांग देत बसतो आणि आमची काय लायकी काढतो'
संजय राऊत बांग देणारा कोंबडा आहे, असं म्हणत भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर खोचक टीका केली आहे. तर ही टीका करण्याबरोबर त्यांनी कोणत्याही मतदार संघात उभे राहून निवडून येऊन दाखवावं, असं खुलं आव्हानच संजय राऊतांना दिलंय. गिरीश महाजन राऊतांवर हल्लाबोल करताना म्हणाले, संजय राऊत म्हणाले होते याची लायकी काय?, अरे मी सात वेळा एकाच मतदार संघातून निवडून आलो आहे. तूम्ही राज्यातील कोणत्याही मतदार संघातून उभे राहून निवडून येऊन दाखवा… घरात बसून सकाळी उठलं की कोंबड्या सारखी बांग देत बसतो आणि आमची काय लायकी काढतो, अशा खोचक शब्दात मंत्री गिरीश महाजन यांनी संजय राऊतांवर सडकून टीका केली. ते बांग देणारे कोंबडे आहेत ते बांग देत राहतील, असं म्हणत गिरीश महाजनांनी राऊतांवर निशाणा साधला आहे.
Published on: Apr 08, 2024 02:15 PM