डोक्यावर परिणाम झालाय भाजपच्या नेत्यानं जरांगे पाटील यांची काढली औकात, काय केली सडकून टीका?

| Updated on: Feb 14, 2024 | 5:16 PM

मनोज जरांगेंनी सरकारवर हल्लाबोल केला. महाराष्ट्रात यापुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा होऊ देणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. यावरूनच भाजप नेते आणि मंत्री नारायण राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका करत पलटवार केलाय.

मुंबई, १४ फेब्रुवारी २०२४ : अंतरावाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू आहे. मराठा आरक्षण आणि सगेसोयऱ्यांसंदर्भातील कायद्यावर मनोज जरांगे पाटील ठाम आहे. दरम्यान, काल मनोज जरांगेंनी सरकारवर हल्लाबोल केला. महाराष्ट्रात यापुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा होऊ देणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. यावरूनच भाजप नेते आणि मंत्री नारायण राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका करत पलटवार केलाय. राणे यांनी ट्वीट करत म्हटले, मनोज जरांगे पाटील याच्‍या डोक्‍यावर परिणाम झाल्‍यामळे तो आता काहीही बडबड करायला लागला आहे. त्‍याला मी मराठयांचा नेता मानत नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्‍ट्रात फिरु देणार नाही अशी बेताल बडबड त्याने केली. त्‍याने आता मर्यादा ओलांडली आहे. ते पुढे असेही म्हटले की, पंतप्रधान जेंव्‍हा महाराष्‍ट्रात येतील त्‍यावेळी जागेवरुन हलून दाखव ! तुला असली मराठ्यांची ताकद दाखवून दिली जाईल. आपली औकात ओळखावी आणि अंथरुणावर पडून राहून नाटके करावीत, असे म्हणत नारायण राणेंची खालच्या पातळीची टीका केली.

Published on: Feb 14, 2024 05:16 PM
नारायण राणे यांचा पत्ता कट, भाजपकडून ‘या’ नेत्यांना राज्यसभेची संधी, कुणाला उमेदवारी जाहीर?
मी जर मेलो तर मला तसंच…. मनोज जरांगे पाटील यांचं मराठा समाजाला आवाहन काय?