उबाठा गटाला नेहमीच रडायची सवय, भाजपच्या बड्या नेत्याची सडकून टीका
गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतिक्षा होती तो निकाल आज विधानसभा राहुल नार्वेकर यांनी जाहीर केला. दरम्यान, हा निकाल येण्यापूर्वी भाजपचे नेते आशिष शेलार यांनी या निकालासंदर्भात भाष्य केले आहे. शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणाचा निकाल काही लोकांना निकाली काढेल आणि सत्य बाहेर येईल
मुंबई, १० जानेवारी २०२४ : शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणाच्या निकालाची प्रतिक्षा संपूर्ण देशाला होती. या निकालाची गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतिक्षा होती तो निकाल आज विधानसभा राहुल नार्वेकर यांनी जाहीर केला. दरम्यान, हा निकाल येण्यापूर्वी भाजपचे नेते आशिष शेलार यांनी या निकालासंदर्भात भाष्य केले आहे. शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणाचा निकाल काही लोकांना निकाली काढेल आणि सत्य बाहेर येईल, असे म्हणत आशिष शेलार यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. या संपूर्ण प्रक्रियेत सत्य टिकणार असल्याचे म्हणत उबाठा गटाला नेहमी रडायची सवय लागली आहे आणि ते संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. ज्यावेळी उबाठा स्थापन झालाय तेव्हापासून नुसतं रडणं हा त्यांचा सार्वजनिक कार्यक्रम आहे. तर आमदार पळाले , खासदार पळाले , सुप्रीम कोर्टाचा निर्णय , निवडणूक आयोगाचा निर्णय, आजची सुनावणी या प्रत्येक वेळी फक्त रडायची सवय उबाठा गटाला लागली आहे, असे म्हणत शेलारांनी ठाकरेंना टोलाही लगावला.