शकुनी मामाची चाल यशस्वी ठरली, नितेश राणे यांची कुणावर बोचरी टीका?
वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटाची आघाडी होऊ नये म्हणून संजय राऊत यांनी अडथळे आणले, असा हल्लाबोल नितेश राणे यांनी राऊतांवर केला आहे. तर वंचित जिंकणार नाही, अशा जागांचा प्रस्ताव त्यांना देण्यात आल्याचे नितेश राणे यांनी म्हटले
शकुनी मामानी पुन्हा एकदा आपली चाल खेळळी आणि यशस्वीही केली. शकुनी मामाची चाल यशस्वी ठरली, असं वक्तव्य करत भाजपन नेते आणि आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाते नेते खासदार संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली. वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटाची आघाडी होऊ नये म्हणून संजय राऊत यांनी अडथळे आणले, असा हल्लाबोल नितेश राणे यांनी राऊतांवर केला आहे. तर वंचित जिंकणार नाही, अशा जागांचा प्रस्ताव त्यांना देण्यात आल्याचे नितेश राणे यांनी म्हटले. तर वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटाची आघाडी होण्याचे सर्व दरवाजे बंद केल्याचे म्हणत शकुनी मामाने आपली चाल यशस्वी केल्याचा आरोप नितेश राणे यांनी केलाय.
Published on: Mar 24, 2024 03:42 PM