Nitesh Rane : दसरा मेळाव्यानंतर आदित्य ठाकरे देश सोडणार? नितेश राणे यांनी काय केला मोठा दावा?

| Updated on: Oct 21, 2023 | 5:04 PM

VIDEO | दिशा सालियान प्रकरणासंदर्भात भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी केला मोठा दावा, आदित्य ठाकरे दसरा मेळावा झाल्यानंतर देश सोडून जाणार? दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरे यांना अटकेची भिती असल्याचे म्हणत त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली.

मुंबई, २१ ऑक्टोबर २०२३ | दसरा मेळावा झाला की आदित्य ठाकरे देश सोडून जाणार, दिशा सालियन केस ज्या वेगाने पुढे जात आहे, त्यामुळे आदित्य ठाकरेंना अटकेची भीती असल्याचे म्हणत भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी निशाणा साधलाय. दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरे यांचं नाव आहे, आणि असे असताना त्यात काहीच नसल्याचे म्हटले जात आहे. जर ती हत्या नव्हती आणि आत्महत्या होती तर मग आदित्य ठाकरे यांनी केव्हिड का दाखल करावा लागला? असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे. इतकेच नाही तर दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरे यांना अटकेची भिती असल्याचे म्हणत त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. यासह दसरा मेळावा झाला की, आदित्य ठाकरे देश सोडून जाणार असल्याची भविष्यवाणी देखील नितेश राणे यांनी केली. इतकेच नाही तर बाहेर गावची किंवा लंडन, दक्षिण आफ्रिकेची तिकीट तयार आहेत आणि ते देश सोडून जाऊ शकतात, अशी माहिती असल्याचे नितेश राणे यांनी म्हटले आहे.

Published on: Oct 21, 2023 05:04 PM
Sanjay Shirsat : … तर काय फरक पडतो? रावण दहनाच्या वादावरून संजय शिरसाट यांचा विरोधकांवर हल्लाबोल
Eknath Khadse : झुलवत ठेवायचं ही तर त्यांची जुनी रीत, एकनाथ खडसे यांचा कुणावर हल्लाबोल?