Nitesh Rane : अमेरिकेत मुलगा जन्माला आला तरी रोहित पवार…, भाजप आमदाराची खोचक टीका
VIDEO | कंत्राटी भरतीचा जीआर रद्द झाल्याच्या मुद्द्यावरून नितेश राणे यांनी भाष्य केले आहे. यासह रोहित पवार यांच्यावरही निशाणा साधलाय. 'रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रा काढायची असेल तर ती मातोश्री आणि सिल्वर ओक भोवती काढावी', नितेश राणे यांचा रोहित पवार यांच्यावर हल्लाबोल
मुंबई, २१ ऑक्टोबर २०२३ | कंत्राटी भरतीचा जीआर रद्द झाल्याच्या मुद्द्यावरून नितेश राणे यांनी भाष्य केले आहे. यासह रोहित पवार यांच्यावरही निशाणा साधलाय. ते म्हणाले, अमेरिकेत कुठला मुलगा जन्माला आला की रोहित पवार म्हणतील हा माझाच मुलगा आहे. स्वतःला जगत गुरु कोणी समजू नये, तर अजून आमदारकीच्या मिश्या सुद्धा फुटल्या नाहीत, असे म्हणत भाजप आमदार नितेश राणे यांनी रोहित पवार यांच्यावर खोचक टीका केली आहे. तर कंत्राटी भरतीसंदर्भातील GR महाविकास आघाडीचे पाप आहे .उद्धव ठाकरें यांचं पाप आहे, त्यांचा बुरखा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फाडला असल्याची टीका नितेश राणे यांनी केली. तर रोहित पवारांच्या आजोबांनी मार्गदर्शन करून तो जीआर काढण्यात आला होता. जर रोहित पवार यांना युवा संघर्ष यात्रा काढायची असेल तर ती मातोश्री आणि सिल्वर ओक भोवती काढावी, अशी सडकून टीकाही नितेश राणे यांनी केली.