‘संजय राऊत हे राहुल गांधी यांच्यासोबत व्हॅलेंटाइन डे साजरा करतील’, भाजप नेत्यानं नेमकं काय म्हटलं?
VIDEO | जिथे हिंदूंवर अन्याय होतो त्याच राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडून मातोश्रीवर दाखल होत उद्धव ठाकरे यांना बांधली राखी, उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वाची व्याख्या काय? आक्रमक झालेल्या भाजप नेत्याचा सवाल
सिंधुदुर्ग, ३१ ऑगस्ट २०२३ | महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक हिंदूंना अस्वस्थ करणारी घटना काल मातोश्रीवर घडल्याचे पाहायला मिळाली. ज्या पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर अन्याय होतात, त्या राच्याच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या थेट मातोश्रीवर दखल होत त्यांनी उद्धव ठाकरे यांना राखी बांधली. हे अतिशय निंदनीय असल्याचे म्हणत उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वाची व्याख्या काय ? हे त्यांनी सांगावे असा सवाल भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी केला. तर ज्या हिंदूंचा जीव गेला त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम काल उद्धव ठाकरे यांनी केले, असे म्हणत नितेश राणे यांनी जोरदार हल्लाबोल केला. रोहिंगे आणि बांगलादेशी यांनी काल दिवाळी साजरी केली असेल, जर चुकून मुंबईची सत्ता ठाकरेंजवळ गेली. तर मुंबईत हिंदू कमी दिसतील आणि रोहेग्यांचीच मुंबई गर्दी होईल, असा हल्लाबोल करत संजय राऊत हे राहुल गांधी यांच्यासोबत व्हॅलेंटाइन डे साजरा करतील असेही म्हटले.