Rahul Narvekar : राहुल नार्वेकर पुन्हा एकदा विधानसभाध्यक्ष, विधानसभेत एकमताने बिनविरोध निवड

| Updated on: Dec 09, 2024 | 12:04 PM

राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधी सोहळा पार पडला. राज्यात सत्तास्थापन झाल्यानंतर विधानसभेचे कामकाज सुरु झाले आहे. मुंबईत सध्या राज्याचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन सुरु आहे.

भाजप नेते आणि आमदार राहुल नार्वेकर यांची पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदी एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल नार्वेकर यांच्या विधानसभा अध्यक्षपदासाठी प्रस्ताव मांडला. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह चंद्रकांत पाटील यांनी अनुमोदन दिले. यानंतर हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी राहुल नार्वेकर यांचा विधानसभा अध्यक्ष म्हणून प्रस्ताव संमत झाल्याची घोषणा केली. यानंतर राहुल नार्वेकर यांची बिनविरोध विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधी सोहळा पार पडला. राज्यात सत्तास्थापन झाल्यानंतर विधानसभेचे कामकाज सुरु झाले आहे. मुंबईत सध्या राज्याचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन सुरु आहे. गेल्या शनिवार आणि रविवारी अशा दोन दिवशी सत्ताधारी आणि विरोधक आमदारांचा शपथविधी पार पडला. यानंतर आज विशेष अधिवेशनाच्या तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात आली. यावेळी एकमताने बिनविरोध विधानसभाध्यपदी राहुल नार्वेकर यांची निवड करण्यात आली आहे.

Published on: Dec 09, 2024 12:04 PM
Saamana : “भाजप हा ढोंग्यांचा पक्ष…’भोंदू भूषण’असा किताब भाजपच्या चाणक्यांना…”, ‘सामना’तून खोचक टीका करत हल्लाबोल
Devendra Fadnavis : ‘ते मी सांगत नाही केक वैगरे…’, राहुल नार्वेकरांचं कौतुक करताना देवेंद्र फडणवीसांना सांगितला ‘तो’ किस्सा