Rahul Narvekar : राहुल नार्वेकर हेच पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष, बिनविरोध होणार निवड
राहुल नार्वेकर यांनी आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. त्यामुळे भाजपच्या राहुल नार्वेकर यांची पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदी निवड होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
भाजप नेते आणि आमदार राहुल नार्वेकर यांची पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदी निवड होणार आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्यासाठी आज दुपारी बारा वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र दुपारी बारापर्यंत केवळ भाजपकडून एकच राहुल नार्वेकर यांचा अर्ज दाखल झाला होता. राहुल नार्वेकर यांनी आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. त्यामुळे भाजपच्या राहुल नार्वेकर यांची पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदी निवड होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. कारण राहुल नार्वेकरांच्या विरोधात विरोधी पक्षांकडून कोणत्याही उमेदवाराकडून अर्ज दाखल कऱण्यात आलेला नाही. त्यामुळे राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड होणार निश्चित मानले जात आहे. तर उद्या राहुल नार्वेकर यांच्या निवडीची घोषणा करण्यात येणार असल्याचीही महिती समोर येत आहे. दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते कालिदास कोळंबकर यांची सध्या हंगामी विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. मात्र उद्या 9 डिसेंबर रोजी विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे.