संजय राऊत यांना जेलमध्ये टाका, भर पत्रकार परिषदेत नारायण राणेंची सरकारकडे का मागणी?
छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेता आणि राजकारण करता, उद्धव ठाकरे, शरद पवार तुम्हाला काही वाटत नाही? संजय राऊत भडकवण्याचं काम करत आहेत. ते राज्यातील वातावरण बिघडवत आहेत. राज्य सरकारने या प्रकरणी त्वरित कारवाई करावी. काय चेष्ठा आहे का?”, असा सवाल करत नारायण राणे आक्रमक झालेत
भाजप नेते आणि खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी भर पत्रकार परिषदेत नारायण राणेंनी संजय राऊत यांना जेलमध्ये टाकण्याची मागणी केली. नारायण राणे म्हणाले, संजय राऊत हे राज्याचं वातावरण बिघडवत आहे, त्यांना जेलमध्ये टाका, असं वक्तव्य नारायण राणे यांनी केलं आहे. तर संजय राऊत यांना राज्यात उद्रेक करून दंगली घडवायच्या आहेत, असा गंभीर आरोपही नारायण राणेंनी केला. तर निवडणुकीसाठी राज्यात कुणालाही दंगली घडवू देणार नाही, असे नारायण राणेंनी म्हणत अप्रत्यक्षपणे विरोधकांना खडसावलं आहे. ‘महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा असून स्वाभिमानी आहे. निवडणुकीसाठी धंदा करत असाल ना संजय राऊत करू देणार नाही. तू कधी गेलास, कधी आलास कोण होतं तिथे… मला माहिती आहे. तुझं कारस्थान हे राज्यात उद्रेक आणि दंगली घडवण्यासाठी आहे.’, असे नारायण राणे म्हणाले आणि संजय राऊतांवर हल्लाबोल करत त्यांना अटक करण्याची मागणी केली.