मेंगळट… काहीच येत नाही तर झक मारायला आलास मुख्यमंत्री बनायला; राणे संतापले
मुंबईतील हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर गेट वे ऑफ इंडिया परिसरात जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधत शिवद्रोह्यांना ‘गेट ऑऊट ऑफ इंडिया’ करु अशी टीका केली होती. त्यावर नारायण राणेंनी पलटवार केलाय.
भाजप नेते आणि खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत नारायण राणेंनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला. तर नारायण राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत जिव्हारी लागणारी टीका केली. उद्धव ठाकरे यांच्यात काय दम आहे माहितीये, कधी कोणाच्या कानाखाली पण नाही मारली. काय धमकी देताय आणि गेट आऊट… असे तू काय धमकी देतोय? तू मुख्यमंत्री असताना जनतेच तुला गेट आऊट केलं, असं वक्तव्य करत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे. पुढे नारायण राणे असेही म्हणाले, पुढच्या निवडणुकीची वाट पाहताय, मुख्यमंत्री मलाच करा…सत्ता कशी येणार? आम्ही सत्ता द्यायला नाही बसलो, आम्ही सत्तेत आहोत आणि राहणार…तुमचं काय काम? काय केलं अडीच वर्षात? फक्त दोन दिवस मंत्रालयात.. असा मेंगळट मुख्यमंत्री आम्हाला नको. काहीच येत नाही अन् काय कळत नाही. मग काय झक मारायला आलास मुख्यमंत्री बनायला असं म्हणत नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर जिव्हारी लागणारी टीका केली.