‘शरद पवार नावाचा अध्याय राज्याच्या राजकारणातून संपला’, भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांचा निशाणा

| Updated on: Nov 26, 2024 | 4:46 PM

महायुतीला विधानसभा निवडणुकीत मोठं यश मिळालं आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा महायुतीचंच सरकार आलं आहे, असं वक्तव्य करत असताना भाजप नेते आणि नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्यावरही भाष्य केले आहे.

महायुतीला विधानसभा निवडणुकीत मोठं यश मिळालं आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा महायुतीचंच सरकार आलं आहे, असं वक्तव्य करत असताना भाजप नेते आणि नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्यावरही भाष्य केले आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर मी पुन्हा उपोषणाला बसेल असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी इशारा दिला होता. मनोज जरांगे पाटलांच्या इशाऱ्यावर भाष्य करताना गोपीचंद पडळकर म्हणाले, ‘देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने सगळे बोंबलून दमलेले आहेत. महाराष्ट्राच्या जनतेने काय विधानसभा निवडणुकीला काय निकाल दिला हे सगळ्यांनी पाहिलेले आहे. महाराष्ट्राच्या जनतेला देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व जपावं असं सर्वांना वाटलं. तळ हाताच्या फोडाप्रमाणे त्यांनी जपलं त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मोठं बहुमत भाजपसह महायुतीला मिळालंय. त्यामुळे त्यांचा विषय जाऊद्या..’, असं गोपीचंद पडळकर म्हणाले. दरम्यान, शरद पवार यांनी ईव्हीएम मशीनवरच शंका उपस्थित केली आहे. ते म्हणाले, ईव्हीएमवर संशय येऊ नये म्हणून छोटी राज्य भाजप हरली आणि विरोधकांना तेथे जिंकून आणलं आणि भाजपनं मोठी राज्य स्वतःकडे ठेवली. यावर गोपीचंद पडळकर म्हणाले, शरद पवारांनी सेवानिवृत्ती घेण्याची गरज आहे. विधानसभेच्या अगोदरच त्यांनी सेवानिवृत्ती घ्यायला हवी होती. लोकांनी त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं. शरद पवार नावाचा आध्याय महाराष्ट्राच्या राजकारणातून संपला आहे, असं म्हणत पडळकरांनी हल्लाबोल केलाय.

Published on: Nov 26, 2024 04:46 PM
शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेच्या निकालावर नाराजी अन् EVM विरोधात रोष
‘उद्धव ठाकरेंची अवस्था ‘शोले’तील जेलर असरानी सारखी, आधे इधर आधे उधर…’, भाजपच्या बड्या नेत्याची बोचरी टीका