‘सत्तेसाठी हिंदुत्वाशी फारकत घेणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करावे’

| Updated on: Mar 27, 2023 | 6:05 PM

VIDEO | स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्द्यावर बोलत असताना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

बुलढाणा : स्वातंत्र्यवीर सावकर यांचा मुद्दा राज्यात चांगलाच गाजत असताना भाजप नेते आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधल आहे. उद्धव ठाकरे यांचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दलचे प्रेम बेडगी असल्याची टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्यावर केली. यावेळी सत्तेसाठी हिंदुत्वाशी फारकत घेणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी आत्मपरिक्षण करावे, असा खोचक सल्लाही राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना दिला. आज सकाळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी गजानान महाराज यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतल्यावर ते माध्यमांशी बोलत असताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. उद्धव ठाकरे यांनी मालेगावात 2024 नंतर भाजप सरकार आले तर निवडणुका होणार नाही असे वक्तव्य केले होते याबाबत बोलताना विखे पाटील म्हणाले 25 वर्ष भाजप सोबत शिवसेनेने युती केली त्यावेळेस त्यांना उपरत्ती झाली नाही विश्वासघाताने सरकार स्थापन करून मुख्यमंत्रीपद मिळवलेल्या उद्धव ठाकरेंना हे वाक्य शोभत नाही त्यामुळे त्यांनी आत्मपरीक्षण करणे हेच योग्य असल्याचे त्यांनी म्हटले

Published on: Mar 27, 2023 06:02 PM
‘ठाण्यात घ्या थायलंडचा अनुभव’, मनसे कार्यकर्त्यांचं नाल्यात उतरून आंदोलन
‘तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं…’, शिवसेनेने सावरकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसला सुनावलं