‘राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाची लोकप्रियता वाढवावी’, कुणी लगावला खोचक टोला

| Updated on: Aug 16, 2023 | 9:11 PM

VIDEO | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आजोजित मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पनवेलमध्ये आज झालेल्या निर्धार मेळाव्यात भाजपवर केलेल्या 'त्या' टीकेवर भाजपच्या बड्या नेत्याचा पलटवार, काय दिलं प्रत्युत्तर?

अहमदनगर, १६ ऑगस्ट २०२३ | “भारतीय जनता पक्षाने मध्यतंरी सल्ला दिला की मनसेने रस्ते आणि टोल बांधायला पण शिका. त्यांना इतकंच सांगतो की, दुसऱ्यांच्या आमदारांना फोडून आणायच्या ऐवजी स्वतःचे आमदार निवडून आणायला शिका आणि पक्ष बांधायला शिका. नको ते सल्ले आम्हाला देऊ नका.”, असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पनवेलमधील निर्धार मेळाव्यामध्ये लागवला. यावर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, ‘प्रत्येक पक्षाला आपला विस्तार करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे एखाद्या पक्षाचं धोरण कुणाला पटलं आणि त्यांना त्या पक्षात जाण्याची इच्छा असेल तर त्यांना अडवू शकत नाही, असे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले. तर यावेळी राज ठाकरे यांनी भाजपवर केलेल्या टीकेवर पलटवार केल्याचे देखील पाहायला मिळाले, राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाची लोकप्रियता वाढवावी म्हणजे लोक त्यांच्याही पक्षात जाण्याचा विचार करतील. असे म्हणत विखे पाटील यांनी राज ठाकरे यांना खेचक टोला लगावला.

Published on: Aug 16, 2023 09:11 PM
‘भाजप नेत्यांवर विश्वास नसल्यामुळे नारायण राणे मुख्यमंत्र्याना भेटले’, कुणी लगावला खोचक टोला
किरीट सोमय्या गुप्त बैठकीसाठी शेकडो पोलिसांच्या फौजफाट्यासह संभाजीनगरमध्ये दाखल, कुणाची घेतली भेट?