नितीन गडकरी यांनी केलं ‘ते’ एक वक्तव्य अन् सत्तेतील नेत्यांची चांगलीच गोची

| Updated on: Oct 23, 2023 | 12:05 PM

tv9 Marathi Special Report | एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप युतीवर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं सूचक वक्तव्य, युतीबाबत विचारलेल्या प्रश्नावर नितीन गडकरी यांचं मजेशीर उत्तर मात्र उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला, काय केलं नितीन गडकरी यांनी वक्तव्य?

मुंबई, २३ ऑक्टोबर २०२३ | राज्यात सध्या भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं सरकार आहे. मात्र, भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या एका वक्तव्यानं सत्तेतील नेत्यांची चांगलीच गोची झाली आहे. शिवसेनेत उभी फूट पडली आणि एकनाथ शिंदेंनी आपल्या समर्थक आमदारांसह शिवसेनेतच वेगळी चूल मांडली. शिंदेंची शिवसेना भाजपसोबत आली आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. साधारण वर्षभराने राष्ट्रवादीही फुटली आणि अजित पवार सत्तेत विराजमान झाले. पण सध्याच्या राजकीय चित्रापासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अनभिज्ञ आहेत का? असा प्रश्न विचारण्याची वेळ आलीय. ती ही नितीन गडकरी यांच्याच एका वक्तव्यामुळं. अभिनेते प्रशांत दामले यांनी सकाळच्या व्यासपीठावर नितीन गडकरी यांना युतीबाबत एक प्रश्न विचारला. तेव्हा नितीन गडकरी नेमकं काय म्हणाले? तुम्हीच बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Oct 23, 2023 12:05 PM
शिंदे सरकारच्या वायद्याची डेडलाईन हुकणार? २५ ऑक्टोबरपासून जरांगे पाटलांचा पुन्हा एल्गार?
पक्ष फुटीनंतर पहिल्यांदाच पवार कुटुंबीय एकत्र, काय होतं निमित्त? एकत्र होते मात्र दुरावा कायम