मनोज जरांगे पाटील बीडमधून लोकसभा निवडणूक लढवणार? भाजप नेत्याचा मोठा दावा
मनोज जरांगे पाटील हे राजकीय पक्षाशी संबंधित आहे, त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा कधीच लपवून राहिली नाही. बीडमध्ये वंजारा समाज विरुद्ध मनोज जरांगे पाटील अशी लढत करण्याची एका राजकीय पक्षाची तयारी असल्याचे म्हणत भाजप नेत्यानं सूचक वक्तव्य केले
नागपूर, २७ फेब्रुवारी, २०२४ : शरद पवार गट मनोज जरांगे पाटील यांना बीड लोकसभेतून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत असून आजच्या महाविकास आघाडीच्या बैठकीत बीडची जागा मिळावी म्हणून पवार गटाचे प्रयत्न असल्याचा मोठा दावा भाजप नेते आशिष देशमुख यांनी केला आहे. ते म्हणाले, मनोज जरांगे पाटील हे राजकीय पक्षाशी संबंधित आहे, त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा कधीच लपवून राहिली नाही. बीडमध्ये वंजारा समाज विरुद्ध मनोज जरांगे पाटील अशी लढत करण्याची एका राजकीय पक्षाची तयारी असल्याचे म्हणत आशिष देशमुख यांनी सूचक वक्तव्य केले आहे. पुढे त्यांनी असेही म्हटले की, आजच्या वाटाघाटीत बीडची जागा ज्या पक्षाला सुटेल तो पक्ष जरांगे पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहे. एसआयटी चौकशीत अंतरवली सराटीचे स्थानिक आमदार यात सहभागी आहे, एक मोठे नेते जरांगे यांना ॲापरेट करत होते. हे वास्तव पुढे येईल. एसआयटी चौकशीनंतर अनेकांची चौकशी होणार आहे. त्यामुळे एसआयटी चौकशी हे सत्य बाहेर येईल, असे म्हणत त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केलाय.