‘या’ भाजप नेत्यानं संजय राऊत यांची काढली औकात, काय म्हणाले बघा व्हिडीओ
VIDEO | फायर ब्रॅण्ड नेता असलेल्या भावाला शिवसेनेतून बेदखल केलं त्यांनाच..., भाजप नेत्यानं उद्धव ठाकरेवर काय केली टीका?
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर राज्यातील राजकीय वातारणात एकच खळबळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे. विरोधक आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत तर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिवसेना नाव आणि पक्षाचं चिन्ह घेण्यासाठी 2000 कोटी रूपयांचा व्यवहार झाल्याचे म्हटले आहे. इकतेच नाही तर न्यायालयं ही सत्ताधाऱ्यांच्या खिशात असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी काल केला होता. राऊतांनी केलेल्या या खालच्या पातळीवरील टीकेवर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करताना त्यांनी संजय राऊत यांची औकातच काढली आहे. ते म्हणाले, ज्या संजय राऊत यांनी एकही कधी निवडणूक लढवली नाही. ते आता भाजपवर आणि शिंदे गटावर टीका करत आहे. उद्धव ठाकरे यांनीही मुख्यमंत्री पदासाठी आणि सत्तेसाठी त्यांनी हिंदुत्व सोडले होते, असा घणाघात आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांनी केला आहे.